पैसे चोरीचे आहेत, हिशोब द्यावाच लागेल

0
200

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. येत्या मंगळवारी वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. यावर संजय राऊत यांनी हा भाजपचा खेळ असल्याचा आरोप केला आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमैया यांनी राऊत यांनी इतका संताप करायची गरज काय आहे. पैसे चोरीचे आहेत, हिशोब द्यावाच लागेल, असे म्हटले आहे.

ते म्हणाले, पीएमसी बँक पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने ईडी असो व इतर तपास यंत्रणा तपास करत आहेत. एचडीएलएचे काही पैसे वेगवेगळ्या लोकांचा खात्यात पैसे गेले आहेत, त्याचा तपास सध्या सुरू आहे. एचडीआयलचा पैसा प्रवीण राऊत यांच्या द्वारे माधुरी राऊत यांच्या खात्यात वळवला व नंतर तो पैसा वर्षा संजय राऊत यांच्या खात्यात आला आहे. त्यामुळे ईडी जर चौकशी करत असेल, नोटीस पाठवत असेल, तर इतका संजय राऊत यांनी इतका गोंधळ करायची गरज काय आहे. पैसे चोरीचे आहेत हिशोब द्यावाच लागेल.