कोल्हापूर (प्रतिनिधी) : येत्या दि. १६ व १७ जुलै रोजी जळगाव येथे होणाऱ्या ज्युनियर व कॅडेट राज्यस्तरीय कुराश स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघ निवड चाचणी सोमवार, दि. ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता पॅव्हेलियन मैदान कसबा बावडा येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. जिल्ह्यातील कुराश क्लब व खेळाडूंनी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन कुराश असोसिएशनचे विभागीय सचिव पांडुरंग दळवी व जिल्हा कार्यकारी अध्यक्ष नितीन कांबळे यांनी केले.

प्रवेशिका भरण्यासाठी खेळाडूंनी जन्मतारीख पुरावा, दोन फोटो, आधार कार्ड आणणे बंधनकार आहे. त्याच्या झेरॉक्स प्रती स्पर्धेच्या ठिकाणी जमा कराव्यात. अधिक माहितीसाठी नितीन कांबळे, अमोल बावडेकर (८९९९४५४६९९७ ) अमोल बावडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी १५ वर्षांखाली मुले- ४६, ५०, ५५, ६०, ६५, ७१ व ७१ किलोवरील,  मुली- ३५, ४०, ४४, ४८, ५२, ५७ व ५७ किलोवरील, १८ वर्षांखाली मुले- ५५, ६०, ६६, ७३, ८१, ८१, ९० व ९० किलोवरील आणि  मुली- ४४, ४८, ५२, ५७, ६३, ७० व ७० किलोवरील असे वजन गट आहेत.