क्षीरसागर यांनीच वारंवार ‘बावडेकरांमुळे’ आमदार झाल्याचं सांगितलंय..! : मोहन सालपे (व्हिडिओ)

0
770

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेश क्षीरसागर यांनी अनेकवेळा जाहीर भाषणात आपण बावडेकरांमुळे आमदार झालो असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोण कोणामुळे आमदार झाले, हे कळण्याइतकी जनता सुज्ञ आहे. तर रविकिरण इंगवले यांच्या कर्तृत्वामुळे सीपीआरमधील एक डॉक्टर नुकतेच राजीनामा देऊन गेले आहेत. त्यामुळे इंगवले यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व द्यायची काहीही गरज नाही, असा पलटवार माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी केला.

माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावतीने सालपे यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.

खालील व्हिडिओ पहा…

 

या पत्रकार परिषदेस माजी स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, अशोक जाधव, श्रावण फडतारे, अजित पोवार सुभाष बुचडे, श्रीराम सोसायटीचे सभापती धनाजी गोडसे,  कुंडलिक परीट, विजय बेडेकर, जयसिंह ठाणेकर, जे. एल. पाटील, सागर येवलूजे आदी उपस्थित होते.