नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी.के. सिन्हा यांनी आज (मंगळवारी) आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे सिन्हा यांनी सांगितले आहे. सिन्हा यांनी अचानक राजीनामा दिल्याने दिल्लीतील प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.  

पी. के. सिन्ह कॅबिनेट सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांची पंतप्रधान मोदी यांच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती. ११ सप्टेंबर २०१९ पासून ते मुख्य सल्लागार पदी कार्यरत आहेत. सिन्हा यांनी १३ जून २०१५ ते ३० ऑगस्ट २०१९ पर्यंत मंत्रिमंडळ सचिव म्हणून काम पाहिले आहे.  

उत्तर प्रदेश कॅडरचे १९७७ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेले सिन्हा यांनी विद्युत आणि शिपिंग मंत्रालयांचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.  त्याचबरोबर त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात विशेष सचिव जबाबदारी सांभाळली आहे.