पुढील १० ते २० वर्षांसाठी मोदींना कोणताही पर्याय नसेल : बाबा रामदेव

0
52

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मी मोदीभक्त नाही, तर राष्ट्रभक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत. त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे, असे स्पष्ट करत भारताच्या राजकारणात सध्या पुढील १० ते २० वर्षांसाठी मोदींना कोणताही पर्याय नसेल, असे मला वाटते, असे विधान योगगुरु बाबा रामदेव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

देशात मोदी फॅक्टर आहे का?  या प्रश्नांवर ते म्हणाले की,  कोट्यवधी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे, जे काही करायचे आहे ते देशासाठी करायचे आहे. प्रभू कृपेने त्यांना हे सगळं काही मिळाले आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्रियोग करावा. तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा, असा खोचक सल्लाही बाबा रामदेव यांनी  यावेळी दिला. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रभक्त असल्याने मी त्यांचा सहयोगी आहे, असेही बाबा रामदेव म्हणाले.