कळंबा कारागृहात पुन्हा सापडला मोबाईल, बॅटऱ्या…

0
105

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये सर्कल क्रमांक सात जवळील एका झाडाच्या बुंध्याजवळ जुना राजवाडा पोलिस आणि कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांना एक मोबाईल, तीन मोबाईलच्या बॅटऱ्या आढळून आल्या. याप्रकरणी तुरुंगाधिकारी राकेश अभिमन देवरे (वय, ३५) यांनी अज्ञातांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आज (शुक्रवार) फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, काही  दिवसांपूवी या कारागृहात अतिसुरक्षा विभाग जवळ १ मोबाईल आणि चार मोबाईलच्या बॅटऱ्या सापडल्या होत्या.  ही घटना ताजी असतानाच जुना राजवाडा पोलिस आणि कारागृह प्रशासनाने काल (गुरुवार) रात्री या कारागृहाची अचानक तपासणी केली. यावेळी  कारागृहातील सर्कल क्रमांक ७ च्या समोरील बाजूला असणार्‍या एका झाडाच्या बुंध्याजवळ एका बिस्किटाच्या पुडाच्या आवरणामध्ये एक मोबाईल हँडसेट आणि तीन मोबाईलच्या बॅटऱ्या आढळून आल्या. त्यामुळे कारागृहात पुन्हा खळबळ उडाली.