कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात चप्पलबंदी करणेत यावी. तसेच मंदिरामध्ये ड्रेनेजचे काम सुरु असून निरूपयोगी साहित्य मंदिराबाहेर हलवावे, दुर्मीळ जुने दगड व्यवस्थित ठेवावेत, अशी मागणी मनसेने देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांचेकडे निवेदनाद्वारे केली. यावर योग्य कार्यवाही न झाल्यास २ एप्रिल रोजी मनसे स्टाईलने चप्पलबंदी आणि बोंब मारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे पन्हाळा तालुका सोशल मिडिया प्रमुख रोहित मिटके यांनी दिला.

निवेदनात म्हटले आहे की, वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या दर्शनासाठी विविध राज्यातून भाविक येत असतात. ते आपल्या चपला मंदिराबाहेर ठेवतात. पुजारीही अनवाणी वावरत असतात, मात्र मंदिर परिसरात देवस्थानचे काही कर्मचारी, अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि ड्रेनेज कामाचे ठेकेदार चप्पल घालून निवांत वावरत असतात. त्यामुळे या सर्वानाच चप्पलबंदी करावी. तसेच मंदिर परिसरात ड्रेनेजचे काम संथ गतीने सुरू आहे. यातील निरूपयोगी साहित्य मंदिराबाहेर हलवावे, दुर्मिळ जुने दगड सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. यावर योग्य कार्यवाही न झाल्यास २ एप्रिल रोजी मनसे स्टाईलने चप्पलबंदी आणि बोंब मारो आंदोलन करण्यात येईल.

यावेळी सचिव पोवार यांनी ठेकेदार यांना बदलण्याची ग्वाही दिली तसेच चप्पलबंदी करू असे आश्वासन दिले. आहे. या वेळी मनसे विभागीय अध्यक्ष राहुल भाट,  लखन लादे,  विशाल मोरे,  नयन गायकवाड आदी उपस्थित होते.