मुंबई (प्रतिनिधी) :  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली असून वरिष्ठ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांना कोविड-१९ संसर्गाची लागण झाली आहे. सौम्य ताप आणि लक्षणं दिसून आल्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यात राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांची चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे, मोठी बहिण जयवंती ठाकरे-देशपांडे अशा तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहेत. त्यानंतर आज राज ठाकरे यांचीही चाचणी घेण्यात आली. त्यानंतर अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय लिलावती हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेत आहेत.