कळे येथे मनसेचा महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा… 

0
37

कळे (प्रतिनीधी) :  गेली ४ वर्षे झाली शेतक-यांनी वीज कनेक्शनची मागणी करूनही अद्याप त्यांना कनेक्शन का दिले नाही. एका ६० वर्षांच्या शेतकरी महिलेने कनेक्शनसाठी अनेक हेलपाटे मारले तरी तिची दखल का घेतली नाही.  असे अनेक प्रश्न विचारत मनसेच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या महवितरणच्या उपकार्यकरी अभियंत्यासह अधिकाऱ्यांना धारेवर धरले.     

यावेळी पन्हाळा तालुक्यातील तळेवाडी व पानारवाडी येथील  शेतकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी शेती पंपाच्या कनेक्शनसाठी आवश्यक रक्कम भरून ही  अद्याप  वीज कनेक्शन मिळली नाहीत. शेतीपंपांना वीज नसल्यामुळे  पाण्याअभावी पिके कोमेजून जात आहेत. शेतकऱ्यांनी पैसे भरुन सुद्धा त्यांना अद्याप वीज पंप कनेक्शन मिळालेले नाही. शेती पंपाला रात्री १ वाजता मिळणारा वीज पुरवठा बंद करून तो विद्युत पुरवठा दिवसा करण्यात यावा. आदी मागण्यांचे  निवेदन उपकार्यकारी अभियंता सचिन पाटणकर यांना देण्यात आले.