मनसेचा ‘मोठा’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

0
188

वर्धा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभर दौरे सुरू करण्याआधी विदर्भात मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत  आहेत.  

विदर्भातील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विदर्भातील ओबीसी चेहरा असलेले वांदिले यांचा   मुंबईमध्ये  शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वांदिले ४०  पदाधिकाऱ्यासोबत प्रवेश करणार असल्याचे  सांगितले जात आहे.  यावेळी हिंगणघाट तालुक्यातील काही सदस्य, सरपंच आणि पदाधिकारी प्रवेश करणार  आहेत.