‘आत्मनिर्भर शेतकरी आत्मनिर्भर भारत’ यात्रा गुरुवारपासून : आ. सदाभाऊ खोत

0
77

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘आत्मनिर्भर शेतकरी-आत्मनिर्भर भारत’ या यात्रेस गुरुवार दि. २४ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्मृतीस्थळी वंदन करून सुरुवात होणार असल्याची माहिती आ. सदाभाऊ खोत यांनी आज (सोमवार) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली.

खोत यांनी सांगितले की, इस्लामपूर येथे २७ रोजी माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारीही सहभागी होणार आहेत. यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, रयतक्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.