‘कोल्हापूर दक्षिण’ची वेगळी ओळख निर्माण करू : आ. ऋतुराज पाटील

0
305

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : आमदार झाल्यानंतर जोमाने खूप काम करण्याची इच्छा होती, पण कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगामुळे त्याला काहीसा ब्रेक लागला. माझी खरी आमदारकी आता दोन महिन्यापासून सुरू झाली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर विकासकामे करून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण करू अशी ग्वाही आ. ऋतुराज पाटील यांनी दिली. ते आज (शनिवार) दऱ्याचे वडगाव वड्डवाडी (ता. करवीर) येथे ७० लाखांच्या विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

प्रास्ताविकात सरपंच अनिल मुळीक यांनी वडगाव- वड्डवाडीसाठी ७० लाखांचा निधी दिल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील आणि आ. ऋतुराज पाटील यांचे आभार मानले. मिलिंद पाटील व अवधूत बोडके यांची भाषणे झाली. यावेळी आमदार पाटील यांना दूधगंगा डाव्या कालवाचे काम पूर्ण व्हावे आणि गावात क्रीडांगण व्हावे, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

उपसरपंच दिगंबर कुंभार, पोलीस पाटील संदीप खाडे, ग्रामसेवक पांडुरंग जगताप, अण्णाप्पा बोडके, संभाजी बोटे, सनी नरके, गणेश मेटील, सदाशिव सासणे, धनाजी बेनके, नानासो बेनके, सतीश खोत, सुरेखा लोहार, सुरेखा परीट आदींसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.