‘ऑयस्टर जैन्स’चा १२ वर्षांचा प्रवास प्रेरणादायी : आ. ऋतुराज पाटील

0
66

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऑयस्टर जैन्सच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान व कोविड लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ४० लोकांनी रक्तदान केले व २७० लोकांनी लस घेतली.
वर्धापनदिनानिमित्त विविध लोकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. ‘ऑयस्टर जैन्स’चा १२ वर्षांचा प्रवास प्रेरणादायी आणि यशस्वी ठरल्याचे प्रतिपादन आ. ऋतुराज पाटील यांनी यावेळी केले. 

कार्यक्रमाला आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजूबाबा आवळे, गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॅामर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, संभवनाथ ट्रस्टचे राजू निंबजीया, जयेश ओसवाल, वनेचंद राठोड उपस्थित होते. ग्रुपचे अध्यक्ष राहुल राठोड, उपाध्यक्ष भावेश ओसवाल, सदस्य – वैभव ओसवाल, कुंदन ओसवाल, अतिश ओसवाल, सनी सुराणा, भाषण ठक्कर, सिद्धार्थ जैन यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.