इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जनतेचं जगणं अवघड झाले आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळण्यासारखे काहीच नाही. घरगुती वीज दरात सवलत द्यावी औद्योगिक संजीवनी योजना राबवावी, केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनानंही घरकुल योजना राबवावी, अशी मागणी करणार असल्याचे आ. प्रकाश आवाडे यांनी म्हटले आहे. ते आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत बोलत होते.

आ. आवाडे म्हणाले की, केंद्र शासनाची घरकुल योजना आहे मात्र त्यात अनेक अटी असल्याने गरजूंना  त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे राज्य शासनानेही घरकुल योजना सुरु करावी, बचत गटांना कर्जात ७ टक्के सवलत द्यावी, औद्योगिक वसाहतीत विकासकामांसाठी राज्य शासनाने निधी दिला पाहिजे.

या वेळी जि. प. सदस्य डॉ. राहुल आवाडे, ताराराणी पक्ष विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, अशोक सौंदत्तीकर, बाळासाहेब कलागते, नरसिंह पारीक, अहमद मुजावर उपस्थित होते.