आम आंबिटकर यांचंही ‘ठरलं’? उद्या जाहीर होणार निर्णय

0
2502

गारगोटी (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीत आमदार प्रकाश आंबिटकर यांचा निर्णय पक्का झाला असून त्यानी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याबरोबर जाण्याचे निश्चित केले असल्याचे समजते. उद्या (शुक्रवार ) सकाळी त्यांचा निर्णय ते पालकमंत्री यांच्या उपस्थितीतच जाहीर करणार असल्याचे समजते. याची तयारीही आंबिटकर यांच्या निवासस्थानी रात्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेले ४ ते ५ दिवस आमदार आंबिटकर यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. स्थानिक राजकारण आणि कार्यकर्त्यांचा दबाव यामुळे त्याना निर्णय घेताना मोठ्या अडचणी येत होत्या. त्यांच्या या निर्णयामाग खासदार संजय मंडलिक यांनी मुख्य भूमिका पार पाडली आहे. याचबरोबर वरूनही महाविकास आघाडीचा निर्णयच पक्का झाल्याने अखेर आमदार आंबिटकर यांनी विरोधी गटाबरोबर जाण्याचा निर्णय पक्का केल्याचे समजते. उद्या (शुक्रवार) रोजी सकाळी पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत हा निर्णय ते गारगोटी येथून जाहीर करणार असल्याचे समजते. आमदार आंबिटकर यांच्या गटाची २५० च्या वर मते आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला चांगलेच महत्व प्राप्त झाले होते. गोकुळची निवडणूक एवढी अटीतटीची होणार असल्याने एक एक मताला मोठी किंमत आहे. आंबिटकर यांच्या निर्णयामुळे विरोधी गटाला बळ मिळणार हे मात्र निश्चित.