विश्वास पाटील फौंडेशनचे कार्य समतेचा विचार देणारे : आ. पी. एन. पाटील

0
108

सावरवाडी (प्रतिनिधी)  : सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेऊन विश्वास पाटील फौंडेशनने केलेले कार्य समतेचा विचार देणारे असल्याचे प्रतिपादन आ. पी. एन. पाटील यांनी केले. कऱवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांच्या मातोश्री श्रीमती जनाबाई यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. 

प्रारंभी विविध मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. सलग ११ व्या वर्षी रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या शिबिरात सुमारे ३२५  रक्तदात्यांनी रक्तदान  केले.

या वेळी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, सत्यजित पाटील, करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, वीरशैव  बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, माजी सरपंच नंदकुमार पाटील, एस. के. पाटील, उपसरपंच सरदार पाटील, राजीवजी सूतगिरणीचे संचालक बाजीराव पाटील, माजी पं. स. सदस्य सुनील पाटील, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, ‘बलभीम’चे अध्यक्ष  राहुल पाटील, कार्यकर्ते उपस्थित होते.