आ. महाडिकांमुळे दक्षिण मतदारसंघ ‘हायमास्ट’ने उजळला : संध्याराणी बेडगे

0 113

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. अमल महाडिक यांनी दक्षिण कोल्हापूर मतदारसंघात गेल्या पाच वर्षात विविध विकास कामे केली आहेत. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त हायमास्ट दिवे बसवल्यामुळे मतदारसंघ हायमास्टच्या उजेडात उजळला, असल्याचे प्रतिपादन जि. प. सदस्या संध्याराणी बेडगे यांनी केले. त्या आ. महाडिक यांच्या दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील प्रचार सभेत बोलत होत्या.

दिंडनेर्ली गावात झऱ्याचा माळ, सरवळेवाडी, मातंग समाज गल्ली, वाडकर माळ, काळगुडे गल्ली, वाडे गल्ली या गल्ल्यासह गावातील प्रमुख रस्त्यावरील घराघरात जाऊन आ. महाडिक यांनी मतदारांशी संवाद साधला.

माझ्या कारकिर्दीत मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सतत आपल्या सुख – दुःखात सोबत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचे जनसेवेचे व्रत चालू आहे ते अखंडित चालू राहील असे आ. अमल महाडिक म्हणाले.

या पदयात्रेत पं. स. सदस्य रमेश चौगुले,  सरपंच मंगला कुंभार, उपसरपंच शिवाजी सुतार, सुरेश ढबे, भगवान पाटील, काशिनाथ मेटिल, विलास पाटील,महादेव पाटील, भानुदास शिंदे, शंकर पाटील पापा, संजय वाडकर, आबास पाटील, प्रकाश कांबळे, शिवाजी तेली यांच्यासह महिला, तरुण सहभागी झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More