कोल्हापूर (प्रतिनिधी) : सीमाभागातील दूध उत्पादकांचे गोकुळ हे आर्थिक उन्नती स्रोत आहे. गोकुळ दूध संघाचे नेहमीच दूध उत्‍पादकांना सहकार्य लाभले असल्याचे प्रतिपादन आ. गणेश हुक्केरी यांनी केले. वीर राणी चेन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघ, श्री सरस्वती महिला को ऑप क्रेडिट सोसायटी व श्री समृद्धी महिला कृषी अभिवृद्धी सहकारी संघ मलिकवाड (ता. चिक्‍कोडी जि. बेळगाव) या संस्थांच्या वास्तूचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी आ. हुक्केरी बोलत होते.

चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, कर्नाटकातील चिक्‍कोडी विभागातील पहिलीच दूध संस्‍था आहे. आज या संस्थेचे संकलन ५०० लिटरपर्यंत वाढले आहे. पुढील काळात संस्‍थेने म्‍हैस दूध वाढवण्‍यासाठी प्रयत्‍नशील  राहावे तसेच गोकुळच्‍या विविध योजनांचा लाभ दूध उत्‍पादकांनी घ्यावा.

या वेळी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, बाळासाहेब पाटील, शोभा पाटील, यशोदिता पाटील, बबन चौगुले, राहुल घाटगे, श्रीपतराव जाधव, बी. आर. यादव, संस्थेचे  अधिकारी, कर्मचारी व दूध उत्‍पादक शेतकरी व महिला उपस्थित होत्‍या.