‘पी. एन.’ यांच्या होमपिचवर आ. नरकेंची बॅटिंग..! (व्हिडिओ)
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. चंद्रदीप नरके यांनी आज (गुरुवार) काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आ. पी.एन.पाटील यांच्या सडोली खालसा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन केले. त्याचबरोबर त्यांनी सडोली खालसा, नंदवाळ, बाचणी, हसूर या गावात ५५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ केला.
सडोली खालसा आणि इतर गावात आ.नरके यांनी भेटी देऊन अनेक विकास कामांचे उद्घाटन केले तो संपूर्ण भाग माजी आ.पी.एन.पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. नरके यांनी सडोली खालसा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून सामाजिक सभागृहासाठी १० लाख तर बाचणी येथे अंतर्गत रस्ते डांबरीकरणासाठी १५ लाख रुपयांची तरतूद केली. तर हसूर दुमाला आणि नंदवाळ येथे अंतर्गत रस्त्यासाठी एकूण ३० लाख रुपयांचा निधी नरके यांच्या प्रयत्नातून मिळाला.
मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे करून विकासगंगा आणली असून आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे शक्य झाले असल्याचे आ. नरके म्हणाले. या वेळी अशोकराव पवार पाटील, विक्रांत पाटील (बाबा) यांचेसह गावातील संस्थांंचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.