आमदार चंद्रकांत जाधव यांची ‘लक्षवेधी’ जनहितार्थ केलेली कामे…

0
431

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आमदार म्हणून कारकीर्द करत असताना चंद्रकांत जाधव यांनी अत्यंत कमी वेळेत लक्षवेधी कामे केली. त्यामुळेच ते जनमाणसात लोकप्रिय झालेत. त्यांनी केलेली लक्षवेधी काम अशी आहेत.

थेट पाईपलाईनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा. कोल्हापुरातील रस्ते दुरुस्तीसाठी १७८ कोटींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे मागणी, राजर्षी शाहू जन्मस्थळाला  राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा. उद्योजकांच्या वीज दराच्या प्रश्नावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला आणि काही प्रमाणात यश. कोरोनाच्या काळातील तीन महिन्यांचे एकत्रित बिल देण्याऐवजी वीज ग्राहकांना प्रत्येक महिन्याचे  स्वतंत्र वीज बिल मिळावे यासाठी पाठपुरावा केला आणि आमदार साहेबांच्या मागणीला यश येत वीज ग्राहकाला स्वातंत्र वीज बिल मिळाले.

कोरोनाच्या काळातील वीज बिलाबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष होता. याबाबत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष सुरू केली. तसेच कोरोनाच्या काळात गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. महानगरपालिकेला वैद्यकीय यंत्रणेसाठी वीस लाख दिले. रिक्षाचालकांना आर्थिक मदत करावी यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा केला. सम-विषम तारखांना दुकान सुरू करण्याचा कोल्हापूरी पॅटर्न तयार केला.

विवाह समारंभात वाजंत्री वादकांना वाद्य वाजविण्याची परवानगी मिळवून दिली. स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी सुरु करण्याची मागणी केली. आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांच्या मागण्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केले. जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असून गरजेच्या तुलनेत व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी उद्योजकांना मदतीचा हात देण्याचे. आवाहन केले होते. यानुसार जिल्हयातील उद्योजकांनी मदतीचा हात देत ७० लाख रूपये किमतीची दहा व्हेंटिलेटर सीपीआरला प्रदान करण्यात आली.

कोरोना विरूध्दच्या युध्दात आमदार जाधव एका योध्द्याप्रमाणे सर्व पातळीवर लढत होते. जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी, आयुक्त, आरोग्य विभाग, छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटलबरोबरच दररोज कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्याबाबतच्या बैठका, चर्चा व नियोजनात आमदार जाधव आघाडीवर होते. मात्र, त्यांची कोवीड १९ ची चाचणी पॉझीटीव्ह आली आणि त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल व्हावे लागले. या काळात ही जनतेची कामे झाली पाहिजेत, यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक सोशल मिडीयावर दिले आणि कार्यालयातील सर्व प्रकारच्या कामासाठी त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.