गारगोटी (प्रतिनिधी) : आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ निवडणुकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय आज जाहीर केला. गारगोटी येथील निवासस्थानी खासदार संजय मंडलिक आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत हा निर्णय त्यांनी जाहीर केला. याविषयीचे वृत्त लाईव्ह मराठीने काल (गुरुवारी) रात्री उशिरा दिले होते. ते आज खरे ठरले.

गेले ५ ते ६ दिवस आमदार आबिटकर यांनी त्यांची गोकुळ विषयीची भूमिका स्पष्ट केली नव्हती यामुळे वेग वेगळ्या चर्चां सुरु होत्या. आबिटकर गटाची २५० च्या वर मते आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका फार महत्वाची होती. दरम्यान आबिटकर आज सकाळी निर्णय जाहीर करणार असून ते महाविकास आघाडी सोबतच जातील असे वृत्त लाईव्ह मराठीने रात्री उशिरा दिले होते. ते आज खरे ठरले असून आबिटकर यांनी खासदार मंडलिक आणि पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत आपला निर्णय जाहीर केला आहे. गोकुळच्या घडामोडी ‘लाईव्ह मराठी’वर सर्वांत अचूक आणि सर्वांत जलद येत असल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमस्थळी सुरु होती.