रांगोळी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र बंदला हुपरी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन आपला सहभाग नोंदविला. मात्र, दुपारनंतर सर्व व्यवसाय सुरळित सूरू करण्यात आले. मात्र, रेंदाळ, रांगोळी, यळगुड, जंगमवाडीमध्ये बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. तिथले सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते.

यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, कम्युनिस्ट पार्टी, वंचित बहुजन या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुभाष चौकात भाजप सरकारचा विरोधात घोषणा दिल्या. तसेच लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला.  तसेच यामधील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मागणीही करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हुपरी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी राष्ट्रवादीचे सुनिल गाट, बाहुबली गाट, अरविंद खेमलापुरे, पृथ्वीराज गायकवाड, शिवसेनेचे अमोल देशपांडे, विनायक विभुते, उषा चौगुले, संताजी देसाई, भरत देसाई, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष राजाराम देसाई, यशवंत कुलकर्णी, काँग्रेसचे मानसिंग देसाई, किरण पोतदार, बाळासो जाधव आदी उपस्थित होते.