अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ‘मिशन एअरलिफ्ट’

0
17

काबूल (वृत्तसंस्था) :  भारत सरकारने अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अफगाणिस्तानातून काबुलहून येणाऱ्या भारतीय हवाई दलाचे आणखी एक सी-१७ विमान आज (शुक्रवार) गाझियाबादमधील हिंदान हवाई तळावर उतरणार आहे.

यावेळी अफगाणिस्तानात अडकलेल्या २९० लोकांना सी-१७ विमानाने भारतात आणणार आहेत. या लोकांपैकी २२० भारतीय आणि ७० अफगाणिस्तानचे नागरिक आहेत. यामध्ये काही अफगाणिस्थानच्या शिखांचाही समावेश असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. तसेच सूत्रांकडून  ऑपरेशन एअरलिफ्ट २ मध्ये काही अफगाणिस्तानचे खासदारही भारतात येऊ शकतात अशी माहिती मिळाली आहे.