कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सुळे येथील शुभांगी धर्मराज कांबळे (वय ४२) या बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत त्यांचे पती धर्मराज गणपती कांबळे (वय ४७) यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुभांगी कांबळे यांचे पती कळे येथील एका सॉमिलमध्ये रोजंदारी करतात. त्यांची मुलगी धनश्री ही बाळंतपणासाठी माहेरी आली आहे. गुरुवार (दि. २२) रोजी शुभांगी कांबळे पती धर्मराज यांना कळे येथे भेटण्यासाठी जात आहे, असे सांगून घरातून निघून गेल्या. शुभांगी यांची उंची चार फूट दहा इंच, रंग गोरा आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.