शनिवार पेठेतून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

0
231

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मित्राला वही देऊन येतो, असे सांगून बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सायकलवरून घरातून बाहेर पडलेला अल्पवयीन मुलगा घरी परत आला नाही. त्यामुळे मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद आई अर्चना विश्वास कवठेकर यांनी आज (गुरूवार) लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

अनिवरद विश्वास कवठेकर ( वय १५,  रा. सरदार गल्ली, शनिवार पेठ) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नांव आहे. तर हा मुलगा अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंगाने गोरा, नाक सरळ, चेहरा उभट, डोळे काळे, उंची ५ फूट २ इंच, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पँट, पायात स्पार्कचे स्लिपर असे बेपत्ता झालेल्या मुलाचे वर्णन आहे. तरी सदर मुलाची माहिती मिळाल्यास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, फोन – ०२३१ २६४१९३३ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.