मंत्र्याचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

0
875

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकचे जलसंधारण मंत्री रमेश जारकीहोळी यांचा अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी ही व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  यामुळे भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून  एका तरुणीवर अत्याचार केला. या पीडित तरुणीच्या जीवाला धोका आहे. तिला सुरक्षाव्यवस्था देऊन या  प्रकरणात पीडिताला न्याय मिळवून द्यावा,  अशी मागणी कलहळ्ळी यांनी बंगळुरुच्या पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, मंत्र्याचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने  खळबळ उडाली आहे. मंत्र्याने पीडित तरुणीवर नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केले.  मात्र, नोकरी दिली नाही. त्यामुळे संबंधित तरुणीने काही क्षण रेकॉर्ड केले, मंत्र्याला ही बाब समजताच त्याने तरुणीला धमकी दिली,  अशी माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ महिन्याभरापूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे.