भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मंत्रिपद, ५० कोटींची ऑफर : काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

0
54

भोपाळ (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांवर होत असलेल्या पोट निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला असताना काँग्रेसच्या नेत्याने भाजपवर आरोप केले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मंत्रिपदाची आणि ५० कोटी रुपयांची ऑफर ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार उमंग सिंघार यांनी केला आहे.

या आरोपानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली असून ज्योतिरादित्य शिंदे यांनी सिंघार यांच्या आरोपांना उत्तर द्यावे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हटले आहे. सिंघार हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिंदे यांनी सिंघार सत्य बोलले आहेत की खोटं हे स्पष्ट करायला हवे, असे  दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. सिंह यांनी ट्विट करत शिंदे यांना याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.