कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा काँगेस कमिटीतर्फे महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांना लस घेणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष ना. सतेज पाटील यांच्या हस्ते हे पाण्याचे टँक काँग्रेस कमिटीला सुपूर्द करण्यात आले.

कोल्हापूर शहरात महापालिका क्षेत्रात १२ लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याला सुरुवात करण्यात आली. ही मोहीम पुढील सहा महिने चालणार आहे. लस घेण्यासाठी केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामान्यांना आधार देण्याच्या भावनेतून जिल्हा काँग्रेस कमिटीने लसीकरण केंद्रावर १५० पिण्याच्या पाण्याचे टँक उपलब्ध करून दिले आहेत. ना. सतेज पाटील यांच्या हस्ते हे पाण्याचे टँक आज (शुक्रवार) जिल्हा काँग्रेस कमिटीला सुपूर्द करण्यात आले.

या वेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, संजय पोवार-वाईकर, किशोर खानविलकर, महंमद शेख, संपत पाटील, संध्या घोटणे, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर, उज्ज्वला चौगले, मतीन शेख आदी उपस्थित होते.