मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे हस्ते नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार…

0
88

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये यड्राव ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर होते. यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी पं.स.चे माजी उपसभापती सतेंद्रराजे नाईक-निंबाळकर, संजय पाटील यड्रावकर, कुणालसिंह नाईक-निंबाळकर, महावीर पाटील,शिवाजी दळवी, लक्ष्मीकांत लड्डा, सरदार सुतार, सवितादेवी नाईक-निंबाळकर,कल्पना लड्डा, पूजा पाटील, प्रकाश आकिवाटे आदी उपस्थित होते.