जावयाला अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया

0
282

मुंबई (प्रतिनिधी) : अमलीपदार्थ विरोधी पथकाने  समीर खान यांना  अटक केल्यानंतर त्यांचे सासरे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही आणि कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला ही गोष्ट लागू असावी. कायदा आपलं काम करेल आणि न्याय होईल. मी न्यायव्यवस्थेचा आदर करत असून त्यावर पूर्ण विश्वास आहे.

मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अमलीपदार्थ विरोधी पथकाने बुधवारी अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई केल्यानंतर समीर  यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना समन्स बजावत चौकशीला बोलावण्यास  आले होते. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत.