मोबाईल शॉपीत लाखोंचा घोटाळा : एकावर गुन्हा

0
91

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील सिलेक्ट मोबाईल शॉपीमधील स्टोअर मँनेजरनेचं २० मोबाईलसह अॅक्सीसिरीज परस्पर विक्री करून कंपनीची लाखोंची फसवणूक केली. याप्रकरणी कंपनीचे लेखापरीक्षक लोमनाथन नागराज (रा. वरशिंगोडा, सिकंदराबाद) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर महैजबीन इप्तीयाज अत्तार (रा. डी वार्ड, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या स्टोअर मँनेजरचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मिरजकर तिकटी येथे सिलेक्ट मोबाईल शॉपी आहे. या दुकानात आरोपी महैजबीन अत्तार या स्टोअर मँनेजर म्हणून काम करत होता. त्यांच्याकडे कंपनीने विक्रीसाठी दिलेले २० मोबाईल आणि १४५ मोबाईल अँक्सीसिरीजची परस्पर विक्री करून कंपनीची १ लाख ८१ हजार २३४ रुपयांची फसवणूक केली. कंपनीच्या लेखापरीक्षणावेळी निदर्शनास आले. तर महैजबीन अत्तार या फरार आहेत.

त्यामुळे लेखापरीक्षक लोमनाथन नागराज यांनी कंपनीच्या फसवणूक केल्याप्रकरणी महैजबीन अत्तार विरोधात फसवणूकीचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. पुढील तपास जुना राजवाडा पोलीस करीत आहेत.