दूध दराच्या फॅटमध्ये प्रति पॉईंट दहा पैशांची वाढ करावी : शहाजी पाटील

0
289

टोप (प्रतिनिधी) :  म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दराच्या फॅटमधील प्रति पॉईंट दहा पैशांची वाढ करून चाळीस पैसे प्रति पॉईंट दरपत्रक करावे. अशी मागणी हनुमान सहकारी दूध संस्था, लाटवडेचे चेअरमन अॅड. शहाजी पाटील यांनी जिल्हा दूध संघाकडे केली आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी गोकुळ दूध संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे . सुरुवातीच्या काळात गाय आणि म्हैस यामध्ये दहा पैशांचा दरामध्ये नेहमी फरक असायचा. मध्यंतरी गाय आणि म्हैसीच्या दुधाचा प्रति पॉईंट दर चाळीस पैसे संघाने निश्चित केला आहे. यामुळे जिल्ह्यात म्हैस दुधाचे संकलन कमी झाले आहे. परिणामी, सध्या सुमारे १५ लाख लिटर दूध संकलन असुनही मागणीप्रमाणे म्हैसीच्या दुधाचा पुरवठा करताना संघाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाने गाय आणि म्हैसीच्या दुधाच्या दारातील समानता कमी करून म्हैस दुधाच्या दरात प्रति पॉईंट दहा पैशांची वाढ करावी, आणि म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी पाटील यांनी केली आहे.