कोल्हापूर (प्रतिनिधी):मुसळधार पावसाने पंचगंगा पातळीत सातत्याने वाढ होत असून राजाराम बंधारा येथे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने शहरातील सखल भागात पुराचे पाणी येत आहे. महापालिकेच्यावतीने आज शहरातील 1019 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले.

यामध्ये विभागीय कार्यालय क्र.1 अंतर्गत रामानंदनगर येथील 13 कुंटुंबातील 40 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्वांना रामानंदनगर तालीम, रेणुका मंदिर या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत शुक्रवारपेठ, पंचगंगा तालीम परिसर, सिध्दर्थनगर या परिसरातील 74 कुटुंबांतील 312 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले. या सर्वांना के.एम.सी.कॉलेज, शाहू विद्यालय, ग.गो.जाधव शाळा, आंबेडकर विद्यालय, मोहमेडन सोसायटी हॉल या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

विभागीय कार्यालय क्र.3 अंतर्गत शाहुपूरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, रिलायन्स मॉल जवळील 68 कुटुंबातील 255 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्वांना चित्रदुर्गमठ, मुस्लीम बोर्डिंग, अंबाबाई शाळा या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.  विभागीय कार्यालय क्र.4 अंतर्गत न्यु पॅलेस, रमणमळा परिसर, रेणुका मंदिर, त्रिंबोली नगर, सनसिटी, महावीर कॉलेज पिछाडी, पोलो ग्राऊंड, जावडेकर अपा. ड्रिम वर्ल्ड, मुक्त सैनिक वसाहत येथील 135 कुटुंबातील 320 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्वांना न्यू पॅलेस शाळा, महावीर कॉलेज, महसुल भवन, दत्तमंदिर सांस्कृतीक हॉल, प्रिन्स शिवाजी विद्यालय, उपले हॉल, समता हायस्कुल या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. पाण्याची पातळी सतत वाढत असलेने उर्वरित नागरिकांनाही स्थलांतरीत होणेबाबत प्रशासनाच्यावतीने सुचना देण्यात येत आहे.

शहरात एखादी आपत्ती, इमारत, झाड पडणे अथवा तीचा काही भाग आकस्मितरित्या कोसळल्यास त्याची माहिती महानगरपालिका विभागीय कार्यालयातील दक्षता विभागास पुढील दुरध्वनी क्रमांकावर कळविणेत यावे.

गांधी मैदान, विभागीय कार्यालय  क्र.1 दुरध्वनी क्र. 2622262 व 2620270, 

शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय क्र. 2 दुरध्वनी क्र. 2543844 व 2543088, 

राजारामपूरी विभागीय कार्यालय क्र. 3 दुरध्वनी क्र. 2521615 व 2530012, 

ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय क्र. 4 दुरध्वनी क्र. 2536726 व 2530011 यावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.