राशिवडे येथे बांधकाम कामगारांसाठी मध्यान भोजन योजना

0
294

राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे (ता. राधानगरी) येथे लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या (सिटू) वतीने श्रमिक कामगारांसाठी मध्यान भोजन योजना सुरु करण्यात आली.या भोजन योजनेचा शुभारंभ जिल्हा सचिव शिवाजी मगदूम, तालुकाध्यक्ष संदीप सुतार यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ आपल्या नोंदीत कामगारांना व्हावा, यासाठी लाल बावटा बांधकाम संघटना राशिवडे शाखेच्या वतीने या योजनेची अंमलबजावणी केली. या योजनेअंतर्गत श्रमिक कामगारांना दोन वेळचे जेवण मिळणार आहे. यावेळी संघटनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सदस्य अशोक सुतार, सरपंच कृष्णात पोवार, शाखाध्यक्ष प्रकाश सुतार, चांदसाब शेख, संभाजी तपेकर, संजय गुडाळे, सुंदर चांदने, सुभाष व्हणाळकर आदीसह बांधकाम कामगार उपस्थित होते.