म्हासुर्लीत सत्ताधाऱ्यांचा धुव्वा : महाविकास आघाडीचा एकतर्फी विजय (व्हिडिओ)

0
1074

कळे (प्रतिनिधी) : धामणी खोऱ्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या म्हासुर्ली (ता.राधानगरी) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने प्रस्थापितांना धक्का देत सर्व ११ जागा जिंकत सत्ता काबीज केली. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा धुव्वा उडला.

धामणी खोऱ्यातील अतिशय संवेदनशील समजली जाणारी व बारा वाड्या आणि एक गाव असणारी म्हासुर्ली येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  निकालानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. म्हासुर्लीत महाविकास आघाडीच्या यशासाठी माजी सरपंच लहू सुतार, दत्तात्रय रावत, लहू जोगम (पैलवान), आनंदा भित्तम, खंडेराव सावत (चेअरमन), संजय सुतार, राजू पाटील (माजी सरपंच) यांचे विशेष योगदान लाभले.

 

म्हासुर्लीसह बारा वाड्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी राधानगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.