महागाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
30

महागाव (वार्ताहर) : दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महागाव येथील यूथ सर्कलमार्फत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुंडापान्ना साव्यान्नावर होते.

राम किंकर यांनी यूथ सर्कलच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या पवन लोहार, संकेत लोहार, प्रथमेश सुतार, मैथली किंकर, वैभवी तौकरी, वैभवी आसलकर, प्रेम पटणशेट्टी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मकरंद देसाई, रवींद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील सोमशेट्टी, आप्पासाहेब लोहार, संदीप परीट, सागर लोहार, शिवानंद तौकरी,  शिवकुमार साव्यान्नावर, युवराज देसाई, रोहित साव्यान्नावर यांच्यासह यूथ सर्कलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.