कोल्हापूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून पुन्हा नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात २६ नोव्हेंबर झालेल्या महामंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. प्रभारी अध्यक्षपदी धनाजी यमकर यांची निवड झाली होती. मात्र, अवघ्या काही दिवसांत हे चित्र बदलले आहे. आज (बुधवार) दुपारी मुंबईत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत धनाजी यमकर गटाच्या काही संचालकांनी पुन्हा राजेभोसले यांना पाठिंबा व्यक्त केला आणि अविश्वास ठराव फेटाळण्यात आला. १३ पैकी ७ संचालकांनी हा ठराव फेटाळल्याने पुन्हा एकदा राजेभोसले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

राजेभोसले यांनी याबाबत ‘लाईव्ह मराठी’कडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.