मेघराज भोसले यांच्या राजीनाम्यावरून सभेत गदारोळ

0
65

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मेघराज भोसले यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संचालक बाळा जाधव यांच्यासह ८ संचालकांनी कार्यकारिणीच्या सभेत केली. परंतु अध्यक्षांनी राजीनामा देण्यास ठाम नकार दिल्याने सभेत जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक आज (गुरूवार) सुरू झाली. यावेळी सुरूवातीलाच मेघराज भोसले यांच्या राजीनाम्याचा मुद्दा घेतला  असता सभेत गदारोळ उडाला. दरम्यान, मेघराज भोसले राजीनामा देणार नसल्याचे मुद्द्यावर ठाम राहिल्याने विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली.