हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मी इंडस्ट्रिज इस्टेट येथे मेगा क्लस्टर कंपनीला आग…

0
91

शिरोळ (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मी इंडस्ट्रीज इस्टेट येथील मेगा क्लस्टर कापडाच्या कंपनीला आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या  दाखल झाल्या असून आग विजवण्याचे प्रयत्न सुरु होते. या कंपनीतील बॉयलर फुटल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले.

लक्ष्मी इंडस्ट्री येथील मेगा क्लस्टर या कंपनीमध्ये कापडावर प्रक्रिया करण्यात येते. घटनास्थळी अग्निशामक दल, पोलीस कर्मचारी, भागातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. मात्र, अद्याप या आगीत किती रुपयांचे नुकसान झाले याचा नेमका आकडा मिळाला नाही.