Published October 18, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या ९ महिन्यात सारथीचे कामकाज ठप्प असल्याने स्वायतत्ता पूर्ववत ठेवावी या आणि इतर मागण्यांसाठी आंदोलने केली होती. नुकत्याच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठकीत पुणे येथे लालमहालावर आंदोलन जाहीर केले होते याची दखल घेऊन शासनाने सारथीला स्वायतत्ता देण्याचा आदेश दिल्याबद्दल नाम. मुश्रीफ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी सारथीसह मराठा आरक्षण सोडवणूकीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत याविषयी चर्चा झाली. यावेळी नाम. हसनसो मुश्रीफ यांनी सारथी बाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत,  दिलीप देसाई, ॲड. गुलाबराव घोरपडे, संदीप देसाई, प्रताप ऊर्फ भैय्या माने, प्रकाश गाडेकर, दिलीप सावंत, मयूर पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023