मुरगूड (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या संदर्भात आज (रविवार) मुरगूड पोलिस स्टेशन येथे मुरगूड शहर व्यापारी असोसिएशन, नगरपालिका आणि पोलीस स्टेशन यांच्यात संयुक्त बैठक संपन्न झाली.  

यावेळी मुरगूड पोलीस ठाण्याचे एपीआय विकास बडवे यांनी, सर्व व्यापाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून दुकान बंद ठेवली पाहिजेत.  सर्वांनी अँटीजन टेस्ट करून त्याचे सर्टिफिकेट आपल्या दुकानात लावले पाहिजे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी ही खबरदारी घेतल्याशिवाय दुकाने उघडू नयेत असे सांगितले.

मुरगूड शहर व्यापारी असोसिएशनचे सदाशिव अंगज यांनी, विकेंड लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवावीत. अत्यावश्यक सेवा वगळता हे ठराविक वेळतच सुरू राहावेत असे सांगितले. यावेळी मुरगूड नगरपालिका, पोलीसंनी हा निर्णय मान्य करून विकेंड लॉकडाऊन कडकडीत पाळण्याचा निर्णय घेतला.

या बैठकीला अमर चौगुले, युवराज मेंडके, देवेंद्र राजपुरोहित, प्रशांत सनगर, राजू चव्हाण, ओंकार पोतदार, प्रदीप भोपळे, नगरपालिकेतर्फे जयवंत गोधडे, इंजिनीयर प्रकाश पोतदार उपस्थित होते.