कळे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीना कांबळे तर उपसरपंचपदी राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी प्रमोद खोपडे होते.

म्हासुर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ग्रामविकास आघाडीने सर्व अकरा जागा एकतर्फी जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. तर यावेळी सरपंचपद हे  राखीव अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते. त्यामुळे मीना  कांबळे यांची सरपंचपदी वर्णी निश्चित होती. तर उपसरपंच पदासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र, सर्व सदस्यांनी आपली एकी कायम राखत राजेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सरपंचपदासाठी मीना कांबळे तर उपसरपंचपदासाठी राजेंद्र पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानुसार निवडणूक अधिकारी खोपडे यांनी कांबळे व पाटील यांच्या निवडीची घोषणा केली.

यावेळी ग्रा.पं. सदस्य संभाजी वडाम, अर्जुन जोगम, बाबुराव कांबळे, दादासो पाटील, लक्ष्मी भित्तम,योगिता मुळे, शबाना मुलाणी,शितल रावत,बाळाबाई अस्वले, माजी सरपंच लहु सुतार, दत्तात्रय रावत, ग्रामसेवक विराज गणबावले उपस्थित होते.