भारतात वैद्यकीय पर्यटनाचा वेग वाढतोय

0
20

मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती वाढत आहे फार जुनी गोष्ट नाही. जेव्हा भारतीय क्लिष्ट शस्त्रक्रिया किंवा प्रायोगिक तत्त्वावर केले जाणारे उपचार लागणार्‍या रोगांसाठी किंवा शारिरीक परिस्थितींसाठी पाश्चिमात्य देशांत जात असत. आता जगभरातील लोक उपचारांसाठी भारतात येत आहेत.

भारतीय आरोग्य उद्योग क्षेत्र जगभरात उच्च गुणवत्तापूर्ण आणि खिशाला परवडण्याजोगे ठिकाण म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे. तेही अशा काळात जेथे पाश्चिमात्य जगामध्ये गुणवत्तापूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडे लक्ष देणे अवघड होत चालले आहे.

भारतामधील आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये हॉस्पिटल्स, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल चाचण्या, आऊटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्यविमा आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश होतो. जीवनशैलीमुळे उद्भवणारे रोग, खिशाला परवडणार्‍या आरोग्यक्षेत्र प्रणाल्या, तांत्रिक प्रगती, टेलिमेडिसिनची महत्त्वाची गरज, आरोग्य विमाक्षेत्राचा वेगाने वाढणारा व्याप आणि ई-हेल्थ (कर सवलती आणि लाभांसह) सारख्या सरकारी उपक्रमांचे वाढते स्वरूप हे भारतामध्ये आरोग्यक्षेत्राची बाजारपेठ वाढवत आहे.