गारगोटी (प्रतिनिधी) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. व्ही. टी. पाटील यांनी श्री मौनी विद्यापीठाची स्थापना केली. त्यातूनच भुदरगड तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला. तालुक्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक विकासात त्यांचे योगदान खूप मोठे असल्याचे मौनी विद्यापीठाचे संचालक प्राचार्य डॉ. आर. डी. बेलेकर यांनी सांगितले.

मौनी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. डॉ. पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन विद्यापीठाचे शासन प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, डॉ. पी. बी. दराडे, प्रा. अरविंद चौगुले, मुख्याध्यापक दिपक मोरे, प्राचार्य सविता इंगवले, प्रा. डॉ. प्रमोद म्हंगोरे, विजय शिंदे, प्रकाश पोवार, मोहन पवार, अरविंद देसाई आदी उपस्थित होते.