कोल्हापूर (प्रतिनिधी) : मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट उत्तरेश्वर थाळीच्या माध्यमातून गेले वर्षभर गोरगरीब आणि गरजवंताना केवळ पाच रूपयांत अन्नदानाचा उपक्रम अखंडीतपणे दररोज सुरू आहे. याबरोबरच या ट्रस्टने अनेक उपक्रम देखील राबवले आहेत. याचाच पुढचा भाग म्हणून आता आपल्या ट्रस्टतर्फे गरजू आणि होतकरू शंभर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार आहोत. जसे आपले दातृत्व वाढेल तसे आणखी गरजवंतांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

चव्हाण म्हणाले की, या ट्रस्टतर्फे स्मशानभूमीला लाकूड दान, लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्तीसाठी आयुर्वेदिक काढ्याचे वाटप, तीनशेहून अधिक पुरग्रस्तांच्या चहानाष्टा, जेवणाची व्यवस्था असे उपक्रम राबवले आहेत. आता गरजू आणि होतकरू शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिकरित्या दत्तक घेणार आहोत. त्या विद्यार्थ्यांचे पालकत्व आपल्या संस्थेशी संलग्न असलेल्या शंभर व्यक्तिंना देणार आहोत. हे पालक दर आठवडा किंवा पंधरा दिवसांनी त्या विद्यार्थ्यांची चौकशी करीत त्यांच्या शैक्षणीक प्रगतीवर लक्ष ठेवतील. यातून या विद्यार्थ्यांची जडणघडण उत्कृष्ट व्हावी असा आमचा मानस असल्याचे सांगितले.

या पत्रकार परिषदेला प्रवक्ता युवराज जाधव, सचिव योगिता चव्हाण, किरण शिंदे, सम्राट शिर्के, सदस्य उपस्थित होते.