मटका घेणाऱ्यास अटक

0
80

कोल्हापूर (प्रतिनिधी) : टिंबर मार्केट परिसरात एक इसम कल्याण मटका घेत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मटका घेणाऱ्या राजाराम बापू पोवार (वय ६६, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) याला अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम व मटक्याचे साहित्य असा सुमारे दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, टिंबर मार्केट येथे एक इसम कल्याण मटका घेत असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. येथे मटका घेणार्‍या राजाराम पोवार याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सोळाशे पन्नास रुपये व मटक्याचे साहित्य असा सुमारे दोन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.