नाशिक : नाशिकमध्ये घडलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे. मुलीची हत्या करून जन्मदात्या आईनेच अज्ञात महिलेकडून मुलीचा खून झाल्याचा बनाव रचला होता. सासरकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आईनेच या मुलीची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नाशिकच्या धृवनगर परिसरामध्ये ध्रुवांषु रोकडे या तीन महिन्यांच्या चिमुकलीची जन्मदात्या आईनेच गळा चिरून हत्या केली आहे. तीन वर्षाच्या चिमुकलीचा शत्रू कोण असावा? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या घटनेत पोलिसांनी केलेल्या तपासात खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाची चौकशी केली. यात हत्या झालेल्या मुलीची आई संशयित युक्ता रोकडे हिनेच तिच्या मुलीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. सासरचे लोक मुलीला बापावर गेली बरे झाले असे म्हणून आईची छळवणूक करत होते. यामुळे आईनेच मुलीविषयी मनात द्वेष निर्माण करत पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली.