संभापूरमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद…

0
135

टोप (प्रतिनिधी) :  पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू केलेल्या माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरु केला आहे. यातंर्गत संभापुरचे सरपंच प्रकाश झिरंगे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आज (गुरुवार) संभापुर येथे राबवण्यात आला. या उपक्रमाला संभापुर ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला.

या उपक्रमासाठी गावातील अनेक दानशुर ग्रामस्थांनी शुभेच्छांच्या स्वरूपात लहानापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जुनी आणि स्वच्छ कपडे, चादर, ब्लँकेट, साड्या अशी अनेक कपडे मोठ्या प्रमाणात जमा केली होती. यावेळी ही कपडे गरजू लोकांना देण्यात आली.

यावेळी अवधूत झिरंगे, प्रमोद झिरंगे, सुरज भोसले, सुरज झिरंगे, देवदूत झिरंगे, नामदेव वागावकर, सर्जेराव मोहिते, तानाजी भोसले, सरपंच संपतराव कारंडे, रावसाहेब कारंडे सलीम महालदार, कार्यकर्ते उपस्थित होते.