वाघापूर येथे विवाहितेची आत्महत्या

0
203

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील वाघापूर  येथील अनुराधा सुशांत बरकाळे  (वय १९) हिने  शनिवारी (दि. २१) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घरी आत्महत्या केली.  याबाबतची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. अवघ्या सहा महिन्यापूर्वी अनुराधाचे लग्न झाले असून संसाराची स्वप्ने रंगावण्यापूर्वीच आपली जीवनयात्रा  संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  वाघापूर  येथील सुशांत साताप्पा बरकाळे भारतीय सैन्य दलात  सेवा बजावत आहेत.  त्यांचे मडिलगे बु येथील अनुराधा मालवेकर हिच्याशी ६ महिन्यापूर्वी लग्न झाले  आहे.  सुशांत सध्या रांची येथे कार्यरत आहे. गावात एक कष्टाळू कुंटूबीय म्हणून परिचीत आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दुःखद घटना घडल्याने वाघापूर गावात शोककळा पसरली आहे.