फुलेवाडी रिंगरोड येथे विवाहितेची आत्महत्या…

0
131

कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुलेवाडी रिंगरोड येथील चंद्राई कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ज्योती मिलिंद सरूडकर (वय ३२. रा. चंद्राई कॉलनी, फुलेवाडी, रिंग रोड) असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  फुलेवाडी रिंगरोड येथील चंद्राई कॉलनीमध्ये ज्योती सरूडकर या कुटुंबासह राहत होत्या. आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास त्यांनी घरातील फॅनला कापडी पट्टीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब काही वेळानंतर त्यांच्या कुटुंबियाच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती जुना राजवाडा पोलिसांना कळवली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयाकडे पाठवला. मात्र, ज्योती सरुडकर यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.